“नाशिक परिवहन विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर कामाचा ताण आणि संस्थात्मक पाठबळ यांचा प्रभाव: कार्य – जीवन समतोलाच्या संदर्भात एक आंतरशाखीय अभ्यास” – Sept 2025
Author: वर्षा ग. मोराडे *
संशोधक विद्यार्थी
गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित
आर.एन. चांडक आर्ट्स, जे.डी. बिटको कॉमर्सअँड एन.एस.
चांडक सायन्स कॉलेज, नाशिकरोड, नाशिक
हांडे विद्युल्लता रा.**
संशोधन मार्गदर्शक
गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित
आर.एन. चांडक आर्ट्स, जे.डी. बिटको कॉमर्सअँड एन.एस.
चांडक सायन्स कॉलेज, नाशिकरोड, नाशिक
Abstract/गोषवारा:
हा शोधनिबंध महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी अनुभवल्या जाणाऱ्या मानसिक ताणाचे स्वरूप, त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि संस्थात्मक पाठबळाच्या उपलब्धतेचा कार्य–जीवन समतोलावर होणारा प्रभाव याचा अभ्यास करतो. महिला कर्मचारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सततच्या तणावपूर्ण वातावरणात काम करतात, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक जीवन यावर गंभीर परिणाम होतो. संस्थात्मक पातळीवरील पाठबळजसे की मानसिक आरोग्य सल्ला, लवचिक कामाचे तास, प्रशिक्षण व कौशल्यविकास कार्यक्रममहिलांच्या कार्यशक्ती आणि समाधानात महत्त्वाची भूमिका बजावते. या अभ्यासात विविध सांख्यिकी तंत्रांचा वापर करून महिला कर्मचाऱ्यांच्या अनुभवांचे विश्लेषण करण्यात आले असून संस्थात्मक सुधारणा व धोरणात्मक शिफारशी मांडण्यात आल्या आहेत.
शोधशब्द (Keywords): मानसिक आरोग्य, कामाचा ताण, कार्य–जीवन समतोल, संस्थात्मक पाठबळ, महिला कर्मचारी, परिवहन विभाग, नाशिक, धोरणात्मक पुनरावलोकन
DOI: 10.65282/sjrl.vo.1.issue.02.017